Wednesday 15 January 2014

गोष्ट तुझी नी माझी....-भाग-3


(गोष्ट तुझी नी माझी....-भाग-2 पासुन पुढे..)

KMK चा पहिलाच दिवस .. नवीन प्रोजेक्ट , नवीन टीम, नवीन जागा, कंपनी तीच असली तरी तिची होणारी चलबिचल बघणाऱ्यांच्या नजरेतून सुटत नव्हती,  मयूर ने आधीच दाखवलेल्या भीतीमुळे तस वाटलं असावं... तिच्या प्रत्येक गोष्टीत Partners in  crime” असणारी तिची जिवाभावाची सखी निशी सुद्धा तिच्या जवळ नव्हती. 

"कसं होईल आपलं इथे,  श्या .. आपण मिस करणार जुन्या गोष्टी.. प्रोजेक्ट सोडताना तितकीशी जाणीव झाली नाही आपल्याला कधी...." तिने स्वतःशीच confess केलं . 

टीम मध्ये कोणीतरी नवीन जॉईन झाली आहे अशी बातमी सगळीकडे एव्हाना पसरली होती, तिच्या कडे  वळणारी प्रत्येक नजर "टीम मधली नवीन मुलगी हीच का ती" असल्याने तिला उगाचंच ओशाळल्यासारखं होऊ लागलं. 

"प्रोजेक्ट चे डॉक्युमेंट मागावेत का?" इतकी  चिडीचूप टीम कधी पहिली नाही , कसे आहेत हे सगळे लोकं , प्रत्येक जण आप-आपल्या कामात बिझी , कुणी साधं बोलायला हि येत नाहीये इथे, मी बोलू का आधी, का नको ??? काय करू?? " ती सगळं मनाशीच बोलत होती.

कधी कधी तिची नजर मॉनिटर वरून वर जायची आणि कोणी ना कोणीतरी टीम मध्ये आलेल्या नव्या मुलीकडे पाहत असल्यामुळे तिचे डोळे पुन्हा कीबोर्ड ला चिटकायचे.
 
"अर्रे कोणी येत का नाहीये, किती उदास प्रोजेक्ट आहे हा...संथ, मयूर बरोबर म्हणत होता, मला नाही रहावस वाटत इथे ...... असो ब्लॉग तरी पाहू बऱ्याच दिवसात काही वाचलं नाहीये चांगलं " असं म्हणून तिने तिचा आवडता ब्लॉग उघडला.

सहजच सुचलं म्हणुन...या निनावी ब्लॉगच्या ती मनापासून प्रेमात पडली होती, त्याच्या प्रत्येक पोस्ट वर तिची कंमेंट असे. काही ट्रॅव्हल ब्लॉग असतात तर काही नुसतीच निसर्ग वर्णने, कधी कविता कुणाच्या तर काही फक्त आठवणी  कुठे काल्पनिक कथा तर कधी कुणाची ब्लॉग शिकवणी पण हा ब्लॉग कोणा एका पठडीत मोडणारा नव्हता, या ब्लॉग मध्ये सगळं होतं या लेखकाची लेखनशैली तिला खूप आवडे. 

"काय लिहितो राव हा.. अनामिक तूच रे माझा सखा सोबती .. मला माहिती आहे कि तू मला नेहेमीच साथ देशील .. "ब्लॉगवरची नवीन पोस्ट पाहून ती खुश झाली "चला नवीन टीम वाले अजून अर्धा तास नाही आले तरी काही हरकत नाही " ती पुटपुटली
"माझी खाऊची पेठ , वा ! यावेळची पोस्ट खाद्यपदार्थांवर दिसतेय , हा मुलगा कशावरहि लिहू शकतो , नुकताच भटकंती करून आलाय तर...!! तिने अर्ध्या तासात पूर्ण पोस्ट वाचून कंमेंट केली,  तरी नवीन टीम ने तिला डिस्टर्ब केलं नव्हत . . . .
"वाह्ह !!! मस्त लिहिलंय याने ... आज का तो दिन बन गया .. चला अजून काही करता येतंय का पाहू .."" 
तिला एवढ्या शांततेची कधीच सवय नव्हती,  प्रोजेक्टच काम,  निशीशी गप्पा आणि मयूरशी भांडण यात तिचा छान वेळ जायचा आणि इथे  २ऱ्या मजल्यावरची शांतता जणू तिला खायला उठली होती . 

काहीवेळ गेला असेल तोच नवीन प्रोजेक्ट चा मॅनेजर तिच्या डेस्कपाशी आला ..
"गुड afternoon miss , actually i was in a meeting , काय ओळख वगरे करून घेतलीस कि नाही " मॅनेजर

तिने नकारार्थी मान हलवली.

हाहाहा .. you seem quite shy…!! come on,  let’s have a formal introduction round for you!!.

आणि तिच्या पोटात गोळा आला .. [अर्रे हा काय करतोय .... एवढं फॉर्मल होत नसते अर्रे मी .. ओळख करून घ्यायला पाहिजे होती आधीच ..!

त्याने सर्वांना मीटिंग रूम मध्ये बोलावलं , मीटिंग रूम मध्ये १७ जण आणि पिन ड्रॉप सायलेन्स. तिच्या पोटात आलेला गोळा काही कमी होत नव्हता. 

"अगं भितेस काय " तिने दचकून मागे पाहिलं ... तुला तुझ्या बद्दल सांगायचंय.. अमेरिकेच्या आर्थिक आघाडीवर भाषण  नाही द्यायचं .. होत असं सुरवातीला .. होशील नीट .. घाबरू नकोस .. माझं नाव रम्या आणि तुझं?!?!” 

तिने तिचं नाव सांगितलं आणि तिला थोडंसं हायसं वाटायला लागलं , मॅनेजर ने formal introduction घेतलं , टीम बद्दल ची थोडीशी माहिती त्यानंतर बरेचसे जण कसे सुट्टीवर आहेत नाहीतर टीम कशी मोठी आहे ते दाखवता आलं असत असे म्हणून उगाचच "सुट्टी आणि तिचे दुरुपयोग " यावर पुढचा अर्धा तास भाषण दिलं . बाकी मॅनेजर टॅगला शोभतील अशी ४-५ वाक्य टाकत मीटिंग ची सांगता झाली. रम्यालाच तिला KT द्यायला सांगितल्यामुळे ती हि जरा खुश झाली .. 

“No  Wonder , हि टीम एवढी शांत असते , हा मॅनेजरच किती बोलतो इथे " ती  स्वतःशीच हसली . 

"खूप बोलतो ना हा ?? " रम्याने बाहेर पडत पडत तिला  प्रश्न केला .  

["अर्रे हिला मनातलं ऐकू येत कि काय " ??!!??]  "नाही ग असेच तर असतात सगळे मॅनेजर्स थोड्याफार फरकाने ... पण हा थोडा जास्त बोलतो " दोघी हसल्या 

"बरं , मी काही डॉक्युमेंट्स देते तुला, तु वाचून ठेवमग उद्यापासून तुझी KT सुरु करू OK ?!?" आणि रम्या तिच्या डेस्ककडे निघून गेली 

" हिच्याशी चांगलं पटेल .. तिला मनापासून नॉर्मल वाटत होतं ... बाकी टीम मधली पहिली वाहिली मैत्रीण तिला रम्याच्या रूपात भेटली होती ..!!
[क्रमश:]

Wednesday 13 November 2013

गोष्ट तुझी नी माझी....-भाग-२



(गोष्ट तुझी नी माझी....-भाग-१ पासुन पुढे..) 

आशाच एका निवांत क्षणी तिच्या मेलबोक्स मध्ये एक मेल खणाणला.. ग्लोबल-लॉगिक ने आय.टी कंपन्यां अंतर्गत होण्यार्या स्पर्धांमध्ये बाजी मारली होती, आणि सहभाग घेतलेल्या सगळ्यांचे आभार आणि पारितोषिक मिळवणार्यांचे अभिनंदन त्या मेलमध्ये करण्यात आलं होतं, गायन-वादन, न्रुत्य, अभिनय जवळ-जवळ सगळ्याच क्षेत्रात ग्लोबल-लॉगिक ने आपला झेंडा फ़डकवला होता. ती फोटोज बघत होती.. लोकांच्या कलेचं कौतुक ती मनातच करत होती.. एक-एक करत सगळे फोटो बघणं चालु होतं. अचानक एका फोटोपाशी येउन तिचे हात थबकले.. बहुतेक एका नाटकाचा फोटो असावा..निळा टि-शर्ट घातलेला एक मुलगा आणि त्याच्या समोर असणारी मुलगी एकमेकांच्या अगदि डोळ्यात-डोळे घालुन पहात होते.. दोघेहि मस्त हसत होते..

“Woowww.. हा कोण असेल.. हा होता जोशमध्ये? पुण्याचा असेल का?? आ्णि ही कोण आहे..? त्याची गर्ल्फ़्रेण्ड असेल का? नसेल तरी अत्तापर्यंत झाली असेल कदाचित.. किति intensity  आहे ह्याच्या डोळ्यात.. डोळे किति छान आहेत... smile किती गोड आहे.. अर्रे..काय होतयं हे आपल्याला.. कदाचित आपल्या कंपनीत असेल.... किंवा नसेल ही..... हे एवढं असं बघण्यची काय गरज आहे..नाटकच आहे ना..!!”” तिचा उगाचच जळफ़ळाट झाला.

Outlook मध्ये एक private फ़ोल्डर बनवुन ते मेल तिने सेव केलं, पुढचे - आठवडे त्याच्या फोटोने तिची पाठ काही सोडली नाहि.. लंचच टाईमिंग बदलुन ही तिला तो कुठेच दिसला नाही.. हळु हळु ती विसरुन गेली.. कधी-कधी तो तिला एकदम आठवे.. पण तसं बैचेन करणं त्याने सोडलं होतं.. आणि नवल म्हणजे ह्याबाबतीत तिने तिच्या सखीला म्हणजेच निशीला काहिच सांगितल नव्हतं..

आशातच एक-दिड महिना उलटला.. मॅनेजर ने क्वार्टरलि टिम मीटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलं. “आपला प्रोजेक्ट आता मेंनटेनन्स फेज मध्ये जाणार आहे..” ची घोषणा केली, तिथे बसलेला प्रत्येकजण काय समजायचं ते समजुन गेला.
काय गं कळ्ळ का काही...” निशी म्हणाली

येस्स.. म्हणजे आतातरी काम बदलेल.. प्रोजेक्ट मेंनटेनन्स फेजमध्ये जातोय आणि एवढ्या मोठ्या टिमची गरज नाहिये आता त्यांना... आता काहितरी नविन शिकायला मिळेल... नविन प्रोजेक्ट.. नविन काम.... आणि..... ” तिच्या आवाजात उत्साह जाणवत होता.

“........आणि नविन टिमपणनिशी मध्येच पचकली.
हो ना यार.. आपल्याला एकच प्रोजेक्ट मिळेल अस पण नहिये ना.....काय यार..!” ...ती

दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि एकदम म्हणाल्याकसल्या सेंन्टि होतोय आपण.. हे..हे..हे..!!” त्यानंतर दोघी बराच वेळ हसत-गप्पा मारत होत्या..

अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत होत्या, त्यानंतर अठवड्या भरातचं टिममध्ये बहुतेकांच्या हातात रीलीज-लेटर पडायला लागले होते. पण तिचा नंबर काही येत नव्ह्ता.. तिची एकुलती एक मैत्रिण पण तिला सोडुन आता दुसर्या प्रोजेक्ट मध्ये शिफ़्ट झाली होती..सरणार्या प्रत्येक दिवसागणिक तिच्या मनातली चल-बिचल वाढत होती.. जे काही थोड फ़ार कंटाळवाणं काम असायचं आता ते देखिल नव्ह्तं.. 

असचं होत.. जे नाहिये आपल्याकडे.. त्याच्याच मागे मन धावतंतिने ब्लोग उघडुन तसाच परत बंद केला.. अणि resume अपडेट करायला सुरुवात केली, प्रोजेक्ट नाव.. क्लायंट.. टिम साईज.. प्रोजेक्ट ची सविस्तर माहिती.. वगैरे महिती तिने पटापट भरुन घेतली.. 

Role & Responsibilities handled…… काय लिहाव बरं इथे..??काहि शिकलोय का आपण इथे.. ?? कसले role.. आणि कसल्या  Responsibilities..!! ..जाउदेत........!” बराच वेळ डोक खाजवुन तिला काहिच सुचत नव्ह्तं

याच विचारात असताना तिला सेम-टाईम या कंपनी-अंतर्गत कामासाठी असलेल्या मेसेंजर वर तिच्या मॅनेजर चा पिंग आला.. आणि तिला वन-टू-वन साठी बोलवण्यात आलं. अगदी क्षणाचाहि वेळ दवडता तिने आपली पावलं मॅनेजरच्या केबिनकडे वळवली..

May I come in sir?.....तिच्या चेहेर्यावर कसलातरी आनंद दिसत होता   
      
Ohh.. yes.. yes.. Please come in…!!..... please sit… how  are you doing?” .. मॅनेजर

“I’m doing good sir..” [बोल.. बोल.. लवकर बोल.. मुद्य्यावर ये अर्रे..... ]

कसयं ना आता, आपलं प्रोजेक्ट आता लाईव्ह गेलयं, तुही बघतच असशील कि जास्त काम उरली नाहियेत, तु खरचं खुप मेहेनत घेतलीस...कमी वेळात बर्याच गोष्टी शिकुन घेतल्या...चांगल काम केलयसं..! ”

हो ते टिम-वर्कच होत..सर.. ” [कित्ति अर्रे हा संथपणा... नक्किच मनमोहनला follow करत असणार]

आता खरचं पुढचे - महिने काहिच काम नाहिये, आणि माझ्या हातात असलं असतं ना तर मी इतका चांगला टेस्टर हातचा जाउ दिला नसता..पण तुला माहितिच आहे कि RMG ला रिपोर्ट द्यावे लागतात... आपल्या कंपनित चांगल्या रिसोर्सेसना असच बसवुन ठेवलं जात नाहि..!! ”

हो सर.. ते कळतयं मला..” [उगाच नाय तुझ नाव गोड्बोले... कित्ति ही साखर-पेरणी..]

म्हणुनच मला आता तुला रिलिज कराव लागतयं, पण तु याकडे पण एक चांगली opportunity  म्हणुन पहा, जसं इथे काम केलसं तसच दुसर्या प्रोजेक्टमध्ये पण कर, तुला बरचं नविन शिकायला हि मिळेल

हो ते ही आहेच..” [भगवान के घर देर है..मगर अंधेर नहि...]

मीटिंग नंतर ती जरा खुशीतच डेस्कवर आली.. पण जितका आनंद व्हायला पहिजे होता तितका होत नव्ह्ता.. कुठेतरि मनातुन वाईट वाटतं होतं.. अगदी सुरुवातीपासुन या प्रोजेक्ट्मध्ये असल्याने तिला प्रोजेक्ट अणि टिमविषयी मनात soft corner  होता..

रिसोर्से-पुलमध्ये म्हणजेच बेंचवर आल्यापासुन तिच आणि ब्लोगच तुटलेलं कनेक्शन पुन्हा जुळुन आलं होतं, कोणीच टोकणारं नसल्याने आता बिनधास्त ती ब्लोग चाळत बसायची, पण जास्तवेळ तिला तिच्या आवडिच्या ब्लोगचा आस्वाद घ्यायला मिळाला नाही कारण आता इंटरव्य्हु सुरु झाले होते. देउन आलेल्या इंटरव्य्हुचं विश्लेषन ती मयुर बरोबर करत असे आणि मयुर त्यावर स्वत:च्या expert comments  देई.

अग्ग्गं तुला समजलयं का?... तुझे तिन्हि इंटरव्य्हु KMKच्याच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधुन झालेत..” मयुर ने कहितरी भयानक शोध अणि shock लागल्यासारखं झटक्यात बोलुन दाखवलं

हो माहितिये मला.. मग त्यात काय दचकण्यासारखं आहे..” तिने मंदपणे उलट प्रश्न केला.. 

अग्गं हे तिन्ही प्रोजेक्ट्स KMKच्याच अंडर येतात.... " त्याच्या चेहेर्यावरचे shock लगल्यासारखे  expressions  अजुनही कायम होते..

“so what..  फ़िरुन फ़िरुन तेच काय सांगतोस... स्पष्ट बोल ना...!! तिचीओळख पाहु कायखेळ खेळायची क्षमता संपत आता आली होती..
 
म्हणजे तुला नक्किच KMK  हा प्रोजेक्ट मिळणार..!!” मयुरने आपलं विशेष ज्ञान पणाला लावुन भविष्यवाणी केली

हो मग मिळाल तर मिळाला..... त्याच काय एवढं???”  ती

अग्गं आपला ओंकार आहे ना.. तो देखिल ह्याच प्रोजेक्ट्मध्ये आहे.. इथे लोक कंटाळतात खुप.. आणि या प्रोजेक्ट मध्ये फ़क्त येण्यार्यांची पावलं दिसतात.. जाण्यार्यांची नाहि.. म्हणजे तुला कधी रिलीज हवा असेल तर मागुन मिळणार नाहि.. तुला कंपनीच बदलावी लागेल.” मयुर

ओय.. तु घाबरवु नकोस रे.. असं काहिहि नाहि होणार... मी कशाला रिलीज मागेन..उगाचच काहिहि असतं तुझं..!!”

तिने अस म्हण्ट्लं खरं.. पण त्याच ते बोलणं तिच्या मनातुन जात नव्हतं.. आत तिला उगाचच भिती वाटत होती. ”आपण का कुणावर विश्वास ठेवायचा.. आपण कुठे experience केलयं अजुन.. कदचित तस नसेलहि.. चांगला प्रोजेक्ट असणार.. कंपनीतला ३र्या क्रमांकाचा सगळ्यात मोठ्ठा प्रोजेक्ट आहे तो.. मग नसेल असं.. ” तिने स्व:ताचिच समजुत काढली..”पण हा सांगतोय त्यात तथ्य असेल तर...??????? ” तिच स्व:ताशीच दुमत होउ लागलं होतजाउदे..मनात एवढ्या शंका असल्यावर कुठे लक्ष लागणार आपलं तिथे.. नकोच तो प्रोजेक्ट... देवा...... ऐकतोस का रे.. नको रे टाकुस त्या प्रोजेक्टमध्ये मलाएव्हाना देवालाहि दुसरा प्रोजेक्ट मिळावा यासाठी साकडं घालणं सुरु झालं होतं 

पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या कुठे घडतात? मध्येच कुठेतरि नियती नावाचा फ़ॅक्टर असतोच ना..!! दुसर्याच दिवशी RMG कडुन मेल आला. **Congratulation.. you have been allocated to KMK project**..         
हाय राम.. कर्म माझं.. मयुर म्हणाला त्यातलं पाव तरी खरं झालं.. मला हाच प्रोजेक्ट मिळाला..श्या...  त्याच दिवशी तिचा डेस्कही चेंज झाला.. अगदी ६व्या मजल्यावरुन- २र्या मजल्यावर तिच सामान हलविण्यात आलं.. पण जाताना आपण अगदिच नाईलाजाने जातोय हे तिने मयुरला जाणवु दिलं नाहि.
[क्रमश:]